उन्हाळी भुईमूग लागवड करताय तर हे वाचायलाच हवं 2021
भुईमुग प्रस्तावना भुईमूग हे तेलबिया पिकामध्ये महत्त्वाचे पिक असुन खरीपात या पिकाखाली महाराष्ट्रात २.३६ लाख हे क्षेत्र असुन त्यापासुन २.५७ लाख टन उत्पादन आणि उत्पादकता १०८२ किं./हे एवढी मिळाली. उन्हाळी हंगामात हे पिक ०.८२४ लाख हे क्षेत्रावर घेतले होते व त्यापासून १.१९६ लाख टन उत्पादन मिळाले आणि उत्पादकता १४५१ किं./हे अशी होती. जमीन मध्यम, भुसभुशीत चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. पूर्व मशागत एक नांगरट व दोन-तीन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. सुधारित वाण अ.क्र वाण प्रकार हंगाम पक्क होण्यास लागणारा कालावधी (दिवस) सरासरी उत्पादन (क्विं/हें) शिफारस १ एस.बी -१२ उपटी खरीप/उन्हाळी १०५-११० ११५-१२० १२-१५ १५-२० संपूर्ण महाराष्ट्रासाठी २ जे.एल- २४ (फुलेप्रगती) उपटी खरीप ९०-९५ १८-२० संपूर्ण महाराष्ट्रासाठी ३ टी.अे.जी – २४ उपटी खरीप/उन्हाळी १००-१०५...